Latest Marathi News

BREAKING NEWS

दख्खनचा राजा जोतिबाची आज चैत्र यात्रा, लाखो भाविक डोंगरावर दाखल

0

महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा आज सुरवात होत आहे. यात्रेच्या निमित्ताने गेल्या चार दिवसांपासून उंचच उंच सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. खोबरं, गुलालाची उधळण आणि चांगभलंच्या गजराने आत्ताच जोतिबा डोंगर गुलालाने माखून गेला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सासनकाठीची पूजा होईल. सायंकाळी पालखी सोहळा होईल.

कोल्हापूरचा रक्षक देवता वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र जोतिबा म्हणजेे सर्वसामान्य लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रसह देवाची सर्वदूर ख्याती पसरली असून अनेकांचे हे कुलदैवत आहे देवाची दरवर्षी चैत्रात सर्वात मोठी यात्रा भरते. तीन दिवसांच्या यात्रेतील मुख्य दिवस आज, बुधवारी आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी होतील.

पहाटे ५ वाजता पन्हाळा प्रांत अमित माळी यांच्यासह देवस्थान समितीच्याक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाअभिषेक होईल. त्यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा होईल. दुपारी १ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन होईल. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्यासह मानकरी उपस्थित असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.