Latest Marathi News

BREAKING NEWS

दहशतवाद्यांकडे ‘तो’ फोटो सापडताच मुंबईतील छाबड हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त

0

मुंबई | पुणे ATS ने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे काही साहित्य सापडले आहे. मात्र, या दोन दहशतवाद्यांकडे मुंबईतील छाबडा हाऊस म्हणजे नरीमन हाऊसच्या गुगल इमेज सापडल्या आहेत. 26/11चा मुंबईवर हल्ला झाला होता. तेव्हा याच छाबडा हाऊसमध्ये दहशतवादी घुसले होते. आता या दहशतवाद्यांकडे छाबडा हाऊसचे फोटो सापडल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत.

सध्या छाबडा हाऊसभोवती बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे फोटो आणि साहित्य सापडल्याने पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने 2 दहशतवादी तरुणांना अटक केलेली होती. या दोन तरुणांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाबा येथील छाबड हाऊसची गुगल इमेज मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या मिळलेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांकडून छाबड हाऊसची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात देखील छाबड हाऊस हे दहशतवाद्यांच टार्गेट होत. आता मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे. पोलिसांना या दोन दहशतवाद्याकंडे काही उपकरणं सापडली आहे.

तसेच ड्रोन बनवण्याचं साहित्यही सापडलं आहे. ड्रोनद्वारे या दहशतवाद्यांना छाबडा हाऊस टार्गेट करायचं तर नव्हतं ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. छाबडा हाऊस बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी सीनिअर पोलीस अधिकारी वारंवार येऊन पाहणी करत आहेत. या ठिकाणी चार सीनिअर पीआय आणि एक एपीआय नजर ठेवून आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.