‘परिसर’ संस्थेद्वारे शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे सुजीत पटवर्धन यांच्या निधन झाले. पुणे, पिंपरी-चिंचवड येथील सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासंदर्भात त्यांची पर्यावरणवादी भूमिका महत्त्वाची होती निभावली. त्यांना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांनी आदरांजली वाहिली आहे.
पटवर्धन गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे निधन झाले.बपुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी यासाठी गेले वीस वर्षाहून अधिक काळ ते प्रयत्नशील होते. बीआरटी, पदपथ, सायकल ट्रॅक, हवेची गुणवत्ता, नदी सुधार हे त्यांच्या जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय होते.
शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी त्यांनी 1980 मध्ये परिसर या संस्थेची स्थापना केली होती. शहरातील सायकल ट्रॅकची दुरवस्था आणि त्यासाठीच्या उपाययोजनां बाबतही ते गेली अनेक वर्षे महापालिकेकडे पाठपुरावा करीत होते. पटवर्धन हे व्यवसायाने प्रिंटर होते प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा
अभ्यास कधी इंग्लंडमध्ये केला होता. तेथून परतल्यावर पुण्यात नारायण पेठेत ‘मुद्रा’ ही प्रिंटिंग प्रेस त्यांनी स्थापन केली होती त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी वापरले.