Latest Marathi News

BREAKING NEWS

काऊंटडाऊन सुरू झालंय, शीतल म्हात्रे यांचा नेमका रोष कोणाकडे ?

0

युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला तर यावेळी सदा सरवणकर, शीतल म्हात्रे हे देखील हजर होते.

वरळी मतदार संघातील तीनही नगरसेवकांना शिंदे गटाने गळाला लावून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचेही चर्चा दबक्या आवाजात होत आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, असे पक्ष प्रवेश करून त्यांना घेरण्याची काही आवश्यकता नाही.

आज A+ वरळी म्हणून आरोडा ओरड करत होते, आज त्याच वरळीत तीन आमदार आहेत. असे असतानाही तेच आमदार सांगताय कोणतीही कामं या मतदार संघात झाली नाही. तर कोणती कामं केली जाताय, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच उद्धव ठाकरेंवर टीका करताना शीतल म्हारे म्हणाल्या की, यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तर येणाऱ्या काळात असे अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे आता काऊंटडाऊन सुरू झालंय असे म्हणत शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटासह आदित्य ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.