Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केलं ते गद्दार, बांगर सेना समर्थकांवर भडकले

0

 

आम्ही बंडखोर, गद्दार नाही, कुणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करू, असा इशारा कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला होता. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या आव्हानानंतर आता शिवसेना समर्थकांकडून त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तुम्हाला लाखवेळा गद्दार म्हणणार, हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारून दाखवावीच, असं आव्हान शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांना दिले होते.

आता आणखी दोन शिवसेना समर्थकांनी फोन करुन बांगर यांची फिरकी घेतल्याचं दिसून आलं आहे. सध्या हे कॉल रेकॉर्डींग व्हायरल झालं आहे. धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला. गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा हे तुमचं विधान ऐकून फोन केल्याचे सांगितले. तसेच, तुम्ही स्वत: कानाखाली आवाज काढायला पाहिजे, गोरगरीब लोकांच्या मुलांना चेतावणी देऊन कशाला सांगतात, असा सवाल मुंढे यांनी केला.

यावेळी संतोष बांगर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारेच गद्दार आहेत, असे म्हटले. तसेच, फोन ठेवा म्हणत फोन कट केला. भाऊ बेरड नावाच्या कळमनुरी मतदारसंघातील मतदारानेही बांगर यांना फोन केला होता. मी नगरला नोकरीसाठी असतो, तुमचं अभिनंदन करायचं होतं. जाता-जाता नगरमार्गे आलात तर सत्कार करायचा होता, असे बेरड यांनी म्हटले. त्यानंतर, तुम्हाला 50 कोटी मिळालेत, मला गरज आहे मला 50 लाख रुपये द्या, मी सहा महिन्यात परत करतो, अशी मागणीही बेरड यांनी फोनद्वारे केली. त्यावर, या ना देतो… उद्याच या… असे म्हणत बांगर यांनी फोनवरील व्यक्तीला प्रतिसाद दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.