Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण !

0

 

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार त्या आयसोलेट झाल्या आहेत. तसेच संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आता सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयराम रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. जूनमध्येच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होते. आता दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या आयसोलेट झाल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना देखील पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: प्रियांका यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. त्यांनी स्वत:ला घरीच आयसोलेट करुन ठेवले आहे. दरम्यान राहुल गांधी यांना देखील अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी अलवर दौरा रद्द केला होता. सोनिया गांधी यांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. तर प्रियंका गांधी यांना देखील दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. 2 जून 2022 ला सोनिया गांधी यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.