Latest Marathi News

BREAKING NEWS

चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक, संजय राऊतांची माहिती

0

ज्याच्या राजकारणात पुण्यातील दोन पोटनिवडणुकांची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच सर्वच राजकीय पक्षांनी दोन्ही जागांसाठी तयारी सुरू केली आहे. दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे. तर, महाविकास आघाडी मात्र दोन्ही जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

आता यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिंचवडची जागा आहे, ती शिवसेनेनं लढावी, असं आमचं मत आहे. तर, पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये निर्णय होईल, असं म्हटलं आहे. आत्ता संजय राऊत यांच्या या विधानाने राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “परंपरा आहे, मात्र अंधेरी पोटनिवडणूक देखील बिनविरोध झाली नाही. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही. पण, नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या. दोन्ही ठिकाणी आमदारांच्या जवळच्या नातेवाईकांनी निवडणूक लढवली होती. अंधेरीची पोटनिवडणूक हा अपवाद होता. अंधेरीची निवडणूक मुंबईत होती आणि भाजपला जिंकण्याची संधी नव्हती. काल रात्री राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर आले होते. दोन्ही पोटनिवडणुकींसंदर्भात बैठक झाली.

यासंदर्भात उद्या पुन्हा बैठक घेत काय निर्णय घ्यायचा याची चर्चा करू. मात्र निवडणूक लढलीच तर जी चिंचवडची जागा आहे, ती शिवसेनेनं लढावी, असं आमचं मत आहे. पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये निर्णय होईल. पण चिंचवडची जागा शिवसेनेनं लढावी, अशी चर्चा झाली यासंदर्भातला निर्णय होईल असं त्यांनी यावेळी बोलुन दाखविले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.