Latest Marathi News

BREAKING NEWS

चिंडवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

0

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप यांची १८ व्या फेरीनंतरही आघाडी कायम आहे. जगताप सुमारे ११ हजारांहून मताधिक्यांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीला सुरुवात होताच सलग ११ फेऱ्यांत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी आघाडी घेतली होती.

१२ व्या फेरीत मात्र त्या पिछाडीवर होत्या. आता १८ व्या फेरीत जगताप यांना ६४०४९ मते, महाविकास आघाडीचे नाना काटे यांना ४९९०७, तर अपक्ष राहुल कलाटे यांना २०६१० मते मिळाली आहेत. यावेळी जगताप तब्बल ११ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने मतदान केले आहे. त्यांच्या प्रेमापोटी मला मते मिळाली आहेत.

दिगवंत जगताप यांनी केलेल्या कामाचीच ही पोचपावती आहे. यापूर्वीही जनतेने लक्ष्मणभाऊ जगताप यांना भरभरून प्रेम केले. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होत आहे. आणखी फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे लीड वाढेल, असा विश्वसाही अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला. दरम्यान चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष आमदार राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.