Latest Marathi News

BREAKING NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत संतोष जुवेकर याने व्यक्त केली इच्छा

0

चित्रपट आणि नाटकात आपल्या कामाची वेगळी छाप पडणाऱ्या आपली जादू दाखवणारा संतोष सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय पाहायला मिळतो. अनेक निरनिराळ्या पोस्ट तो शेअर करत असतो.
त्याच्या आगामी प्रोजक्टविषयी माहिती तो देत असतो. संतोषनं नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात भाष्य करत एक पोस्ट केली जिनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या पोस्टमधनं संतोषनं शिवरायांचे नाव घेत आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. त्यानं एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे संतोषनं त्याच्या ‘पावनखिंड’ सिनेमातील एक गाणं आहे त्याचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की,खूप इच्छा होती आणि अजूनही आहे माझ्या शिवबा राजं वर निघणाऱ्या सिनेमात काम करण्याची  फक्त एक गाणं मिळालं आनं जीव आपसूक गुंतला, वीज कडाडली अंगात आणि नाद नाद लागेल असा नाचलो. ❤

अख्खा सिनेमा मिळाला करायला तर काय आग लागलं ओ माझ्या राज्याच्या आशिर्वादानं ही संधी पण लवकरच येईल माझ्या आयुष्यात जय भवानी जय शिवराय  जय जय रघुवीर समर्थ ..संतोषनं या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.संतोष जुवेकरच्या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत त्याची मनातील इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना करत अभिनेत्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.