संभाजीनगर : संभाजीनगर येथे दोन गटात झालेल्या वादावादीनंतर ठाकरे गटाचे खासदा संजय राऊत यांनी थेट शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावला आहे, राज्यात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? असा सवाल शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी केला. आज माध्यमांशी बोलता असताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला होता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होत आहे. ही सभा होऊ नये म्हणून कारस्थान केलं जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि सभेला परावनगी नाकारायची यासाठी हे सगळं केल जात असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रासह देशभरात राम नवमीच्या निमित्तानं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी हा प्रयत्न यशस्वी झाला. अनेक ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंज्यसाची भूमिका घेतली
तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली सभेला परवानगी मिळू नये हे कारस्थान असल्याचे राऊत म्हणाले. यापूर्वी रामनवमी दिवशी कधी हल्ले झाले नव्हते. सध्या शिवसेनेच्या खेड, मालेगावमधील सभेला जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. त्यांनतर काही लोकांना हाताशी धरुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राऊत म्हणाले. कारण नसताना जातीय तेढ निर्माण केली जात असल्याचे राऊत म्हणाले.