Latest Marathi News

BREAKING NEWS

“गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती…!”

0

गडचिरोली |

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ आणि अडपल्ली कॅम्पस कोनशीला समारंभ संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हेही उपस्थित होते. विकासाकांक्षी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना उच्च शिक्षण देणारे गोंडवाना विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांपैकी एक गणले जावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम रमेशजी बैस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर,आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित,कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे आदी मान्यवरांसह उपस्थित राहिलो.

Leave A Reply

Your email address will not be published.