चंद्रकांत पाटील यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन… सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी आईकडे केली प्रार्थना
पुणे , २२ ऑक्टोबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पुण्यातील विविध ठिकाणी नवरात्रीनिमित्त देवीचे दर्शन घेतले. विश्व हिंदू मराठा संघ आणि स्वारद फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडीचे शिवतीर्थावर स्वागत केले.
चंद्रकांत पाटील यांनी आज अष्टमीचे औचित्य साधून विश्व हिंदू मराठा संघ आणि स्वारद फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडीचे शिवतीर्थावर स्वागत केले. यावेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाटील अभिवादन केले.
त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील तुळजाभवानी मंदिरात जाऊन आईचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो अशी आईकडे त्यांनी प्रार्थना केली.
नवरात्रोत्सवानिमित्त पाटील यांनी कोथरुड मधील बाणेर-बालेवाडी-सुतारवाडी भागातील नागरिकांच्या घरी भेट दिली. दरम्यान घरी विराजमान झालेल्या देवीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. तसेच सर्वांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्यासह समृद्धी लाभो अशी भावना व्यक्त करून सर्वांना नवरात्रीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.