Latest Marathi News

BREAKING NEWS

चंद्रकांत पाटील यांना आज कोथरुडमधील श्री दत्तात्रेय मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा लाभला बहुमान

0

पुणे, २१ डिसेंबर : कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर भागात लोकसहभागातून श्री दत्तात्रेय मंदिराचा आज जीर्णोद्धार करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा बहुमान लाभला.

आज दत्त मंदिरात दत्त महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि दत्तयागाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांनी दत्त मंदिरात श्री दत्तात्रेय यांचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी मंदिराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कर्वेनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.