Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापूर मधील भारतनगर, सोळोखे पार्क येथील धम्म चक्र बुध्द विहार या पवित्र वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास चंद्रकांत पाटील यांची हजेरी

0

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी कोल्हापूर मधील भारतनगर, सोळोखे पार्क येथील धम्म चक्र बुध्द विहार या पवित्र वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची देखील उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्तीप्रतिष्ठापना करण्यात आली. या पवित्र वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘पहिली धम्मपरिषद २०२४’ मध्येही पाटील सहभागी झाले.

यावेळी माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील सर, महेश जाधव, राहुल चिकोडे, मुस्ताक मलबारी, सोमनाथ घोडेराव, कौस्तुभ गावडे, रूपाराणी निकम, संग्राम निकम, महेश वासुदेव डॉ. नंदकुमार गोंधळी, डॉ. सिद्धार्थ घोडेराव, सुखदेव बुध्याळकर, गुणवंत नागटिळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.