Latest Marathi News

BREAKING NEWS

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाच्या  होस्टसाठी  महेश मांजरेकर नाही तर ‘या’ अभिनेत्याच्या नावाची चर्चा

0

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा असते. या कार्यक्रमात दररोज काही न काही वेगळ्या गोष्टीघडत असतात. ‘बिग बॉस’ मराठीच्या  घरात येणारे स्पर्धक, त्यांच्यात होणारी मैत्री, वाद, नवीन टास्क या सगळ्यामुळेच हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत असतो. तर प्रेक्षक सुद्धा कलाकारांना ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून पाहण्यासाठी उत्सुक असतात. ‘बिग बॉस’ मराठीचे तीनही पर्व हिट झाले. प्रेक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाला पसंती दिली. त्या नंतर आता ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग बॉस’ मराठीच्या आधीच्या तीनही पर्वांचं सूत्रसंचालन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. पण आता नवीन पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर  करणार नाही अश्या चर्चा सुरु आहेत. महेश मांजरेकर यांच्या जागी ‘बिग बॉस’ मराठीचा होस्ट म्हणून कोण येणार आहे याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

‘बिग बॉस’ मराठी या कार्यक्रमाच्या तीनही पर्वांचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. ‘बिग बॉस’ मराठीच्या निर्मात्यांनी महेश मांजरेकरांसोबत तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. ते कॉन्ट्रॅक्ट आता संपलं आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या ऐवजी ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमाचा नवा होस्ट कोण असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

‘बिग बॉस ‘ मराठीच्या चौथ्या पर्वाचा होस्ट म्हणून, मराठी मधील आघाडीचा कलाकार अशी ओळख असलेला अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’  होस्ट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धार्थ जाधव यांनी मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याने त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. मराठी सोबतच सिद्धार्थ जाधवने हिंदी चित्रपटांमध्ये विशेष बहुमूक साकारल्या आहेत. सिद्धार्थ जाधव लवकरच ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाचा होस्ट म्ह्णून प्रेक्षकांसमोर येणार आहे. असं बोललं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.