Latest Marathi News

BREAKING NEWS

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती ग्रुप आयोजित रक्तदान शिबिर — १११ रक्तदात्यांचा सहभाग

0

मोडनिंब (ता.माढा) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती ग्रुपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १११ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अनेकवेळा रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते. हीच गरज ओळखून छत्रपती ग्रुपकडून शिबिराचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष रणवीर सावंत यांनी दिली.प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात आले.गावात सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपत अशा उपक्रमांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने, भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.