नवी दिल्ली | देशात आगामी काळात नऊ राज्यातील निवडणुका, पुढील वर्षी होणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक आदी विषयावर रणनीती ठरविण्यासाठी भाजपाची कार्यकारिणी आजपासून दिल्लीत सुरु होणार आहे. नऊ राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काय उपाय योजना करता येईल, हा प्रमुख मुद्या या बैठकीत आहे. कुठल्याही परिस्थिती विधानसभा निवडणुका जिंकणारच, यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह३५ केंद्रीय मंत्री, १२ मुख्यमंत्री, ५ उपमुख्यमंत्र्यांसह साडेतीनशे कार्यकारीणीचे सदस्य बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवून त्यांना पक्षाशी कसे जोडता येईल यासाठी भाजप प्लॅन आखणार आहे. मुस्लिम महिलांना सामाजिक सुरक्षा कशा पद्धतीने देता येईल, याची चर्चा बैठकीत होणार आहे. गुजरात निवडणुकीनंतर पहिल्यांदाच कार्यकारीणीची बैठक होत आहे, या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. संसद मार्गावर कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत, त्यानंतर एनडीएमसी सेंटरपर्यंत एका रॅलीच्या माध्यमातून मोदींचे स्वागत करण्यात येणार आहे.
दरम्यान या बैठकीत सेवा, संघटन आणि समर्पण,विश्व गुरु भारत, सर्वप्रथम सुशासन, मुस्लिम महिलांना सामाजिक सुरक्षा, वंचितांचे सशक्तीकरण, सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीस या विषयावर चर्चा होणार आहेत. युक्रेन-रशियाच्या युद्धात भारताने केलेल्या आँपरेशन गंगा मोहीमेचा आलेले यश, दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांना केलेली मदत, अन्य देशांना कोरोना लस देणे, वैश्विक संकटाचा सामना करीत असताना भारत जगातील पाचवी महासत्ता म्हणून ओळखला जात आहे. या माध्यमातून ‘विश्व गुरु भारत’ही संकल्पनेवरही बैठकीत चर्चा करण्यात येईल.