अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या पेहराव्यावरून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावरुन दोघींमध्ये चांगलाच वाद रंगला होता. त्यांचा वाद राजकीय वळणावर गेला. मात्र आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या चित्रा वाघ यांनी उर्फीचे कौतुक केले. त्यामुळे आता या दोघींमधल्या संघर्षाला विराम मिळाल्याचे दिसत आहे.
उर्फी जावेदबद्दल प्रश्न विचारला असता चित्रा वाघ म्हणाल्या, माझा विरोध हा कोणत्या महिला किंवा तिच्या धर्माला नव्हता आणि नाहीच. तो तिच्या विकृतीला आहे. तसेच तुम्ही तिच कधी तरी कौतुक केल पाहिजे. कारण सध्या ती महिला पूर्ण कपड्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे सारख सारख असू बोलू नका. कोणी तरी सुधारत असून आपण त्याच कौतुक देखील करायला पाहिजे.
पुढे बोलताना वाघ म्हणाला की, कदाचित उर्फीने आता तिने काही तरी ठरवल असेल. म्हणूनच ती सध्या चांगल्या कपड्यामध्ये दिसत आहे. त्याचे अनेक फोटो मला अनेक जण शेअर करीत आहेत. त्यामुळे आपल तेवढच म्हणण आहे की चांगल कपडे घाल आणि निवांतपणे फिर असं विधान त्यांनी केलं होत.