Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

 

मिरारोडमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. य हल्ल्यामुळे मिरारोड भाजपात एकच खळबळ माजली आहे. रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात महिला पदाधिकारी सुल्ताना खान जखमी झाल्या आहेत. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली. सुल्ताना खान यांच्या गाडीवर रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी अचानक हल्ला चढवला. दोन अज्ञात इसमांनी मध्यरात्री त्यांच्यावर हल्ला केला आहे. यात सुलताना यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.

रविवारी रात्री सुल्ताना ह्या त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मिरारोड मधील नया नगर जवळ दुचाकी वरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी गाडीवर हल्ला करण्यात आला होता. तसेच धारदार वस्तूने सुल्ताना यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने यात फक्त सुलताना यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

या हल्ल्यावेळी पतीने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुलताना खान यांना जवळच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडित नेत्या घाबरलेल्या अवस्थेत होत्या. त्या जबाब देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. पीडित महिलेचा जबाब नोंदवला जाईल त्यानंतर दोषी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.