Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे यश

0

बार्शी: दि. १३
राज्यस्तरीय शालेय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, परभणी व जिल्हा म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे दि. १२ व १३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंनी म्युझिकल चेअर स्केटिंग व स्केटिंग स्पीड रोलर या प्रकारात १९ वर्षं वयोगटात मोठे यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना श्रीशा स्केटिंग क्लब बार्शीच्या सौ . प्रियंका येडलवार यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे:

१. प्रसाद प्रमोद मांडे – प्रथम क्रमांक
२. शिवराज अविनाश साळुंखे – प्रथम क्रमांक
३. पृथ्वीराज हेमंत जाधव – प्रथम क्रमांक
४. श्रीशा जितेश येडलवार – प्रथम क्रमांक
५. कृष्णा आनंद ढाळे – द्वितीय क्रमांक
६. कार्तिकेय रवींद्र पवार – द्वितीय क्रमांक
७. प्रसाद पांडुरंग शिंदे – द्वितीय क्रमांक

     तसेच १६वी राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्पर्धा २०२५ चे आयोजन म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संलग्न म्युझिकल चेअर फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा वय व वजन प्रमाणे आठ वर्ष, अकरा वर्ष, चौदा वर्ष, सतरा वर्ष व  एकोणीस वर्ष अशा पाच वय व वजनी गटांमध्ये घेण्यात आली. याही स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंनी मोठे यश संपादन केले.

स्केटिंग स्पीड रेस प्रकार:-
१. स्वरूप वैभव पोळ – रौप्य पदक
२. अथर्व अनंत केसकर – सुवर्णपदक
३. प्रसाद पांडुरंग शिंदे – सुवर्णपदक
४. आरव निरंजन गांधी – कांस्य पदक
५. सर्वेश शिवशंकर उदबळे – सुवर्णपदक
६. सोहम दिपक सावंत – सुवर्णपदक
७. कार्तिकेय रवींद्र पवार – सुवर्णपदक
८.द्वारकेश रुषिकेश झारेगावकर – सुवर्णपदक
९. शिवराज अविनाश साळुंखे – रौप्य पदक
१०. प्रसाद प्रमोद मांडे – सुवर्णपदक
११. पृथ्वीराज हेमंत जाधव – सुवर्णपदक
१३. कृष्णा आनंद ढाळे – कांस्य पदक

म्युझिकल चेअर स्केटिंग प्रकार:-
१. स्वरूप वैभव पोळ – कांस्य पदक
२. अथर्व अनंत केसकर – सुवर्णपदक
३. प्रसाद पांडुरंग शिंदे – सुवर्णपदक
४. आरव निरंजन गांधी – रौप्य पदक
५. सर्वेश शिवशंकर उदबळे – सुवर्णपदक
६. सोहम दिपक सावंत – रौप्य पदक
७. कार्तिकेय रवींद्र पवार – सुवर्णपदक
८. द्वारकेश रुषिकेश झारेगावकर – सुवर्णपदक
९. शिवराज अविनाश साळुंखे – सुवर्णपदक
१०. प्रसाद प्रमोद मांडे – रौप्य पदक
११. पृथ्वीराज हेमंत जाधव – रौप्य पदक
१२. कृष्णा आनंद ढाळे – सुवर्णपदक

 यावेळी महाराष्ट्र म्युझिकल चेअर स्केटिंग चीफ पॅटर्न श्री. संतोष कठाळे, गीता साखरे मॅडम, म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. प्रशांत नाईक, सचिव श्री . तुकाराम ठोंबरे,  लक्ष्मी मगर माजी शिक्षणाधिकारी विठ्ठल पोचणारे सर, गणेशराव शिंदे शिक्षणाधिकारी  हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ७ विभागातून एकूण ४८० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजत्या खेळाडूंची गोवा येथे ३ व ४ मे  रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.