Latest Marathi News

BREAKING NEWS

‘माझ्या बायकोला ढिगानी मतं द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही,’ अजित पवार

0

दौंड: बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौंड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यासह महायुतीचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी मतदारांना आवाहन करत सुनेत्रा पवारांना विजयी करा असे सांगितले तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वच जण झपाटून काम करू असा शब्द राहुल कुल यांनी दिला.

यावेळी अजित पवार म्हणाले की,  राज्याचा आणि देशाचा विकास झाला पाहिजे. तोच आम्हाला हवा आहे आणि याच मुद्द्यावर आम्ही महायुतीसोबत लोकसभा निवडणूक लढवत आहे. बारामतीसारखाच विकास दौंडमध्येसुद्धा केला जाईल. त्यासाठी लागेल तेवढा निधी आमच्याकडे आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा व जलसंपदा खाते आहे. त्यासाठी अर्थ खात्यावरूनच सर्व निधी वर्ग केला जातो, हेसुद्धा लक्षात असूद्या. सर्वांच्या विकासासाठी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी करा. असे आवाहन अजित पवारांनी मतदारांना केले.

तर  ‘माझ्या बायकोला ढिगानी मतं द्या, तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन केलेय  केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यात दौंड विधानसभा मतदारसंघातील आमदार राहुल कुल देखील उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेला आम्ही कमी बोलू, काम मात्र जास्त करू. सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी करू हे नक्की आहे. राजकारणातील आलेल्या वाईट अनुभवांचा पाढा वाचत असताना कुल यांना आपले अश्रू अनावर झाले. गट-तट बाजूला ठेवून सुनेत्रा वहिनी यांना मतदान करून त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावयाचे आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन या वेळी कुल यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.