Latest Marathi News

BREAKING NEWS

‘बंबई मेरी जान’ वेब सिरीजच्या नावावरून मनसे आक्रमक

0

‘बंबई मेरी जान’ ही मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे या वेब सिरीजच्या ‘बंबई’ नावावरून मनसे आक्रमक झाली आहे. निर्माता दिग्दर्शकांनी ‘बंबई’ हे नाव बदलावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करत हे नाव बदलण्यास भाग पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

यापूर्वी सुद्धा चित्रपटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘बंबई’ या नावावरून मनसेने आक्रमक पवित्रा धारण करत अनेक दिग्दर्शकांना हे नाव बदलण्यास भाग पाडलेलं. त्यामुळे नुकतीच प्रदर्शित झालेली बंबई मेरी जान या वेब सिरीज निर्माता दिग्दर्शकांनाही नाव बदलण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे मनसेचे सरचिटणीस आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहेय. यात त्यांनी म्हटलंय…

ते आपल्या तवॊतमध्ये म्हणतायत की, “नावात काय आहे?” असे शेक्सपियर म्हणून गेला.. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा’तच सर्व काही आहे असे वाटतं. फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून 75 वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या India ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही. पण मग.. ‘भारत’ नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक ‘मुंबई’ च्या नाव बदला संदर्भात इतके उदासीन कसे? असे त्यांनी म्हंटले आहे.

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल बडेमियाँच्या किचनमध्ये उंदीर आणि झुरळ; एफडीआय ने ठोकलं टाळ

…..तर उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर सुद्धा पडू शकणार नाही – नितेश राणे

Leave A Reply

Your email address will not be published.