Latest Marathi News

BREAKING NEWS

आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल शिवसैनिक आहो, संजय राऊतांसारखा चायनीज मॉडेल नाही

0

खासदार संजय राऊत नेहमीच विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसतात. त्यांच्या वक्तव्यावर अनेकदा वाद निर्माण होतात. मात्र आता संजय राऊत यांनाभारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी थेट इशारा दिला आहे. ‘भाजप नेत्यांविरोधात वक्तव्य करणं संजय राऊत यांनी थांबवली नाही तर, आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडू’, असं नितेश राणे म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

नितेश राणे म्हणाले की, “संजय राऊतांनी माझी पत्रकार परिषद ऐकावी आणि सेव्ह करून ठेवावी, नाही तर नंतर म्हणाल नितेश राणेंनी मला सांगितलं नव्हतं की माझी एवढी इज्जत काढणार आहे. यापुढे आमच्या कोणत्याही नेत्यावर खोटा आरोप केला, अपशब्द वापरला तर संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. आम्ही ओरिजनल शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे ओरिजनल शिवसैनिक म्हणून मोठे झालो आहेत. संजय राऊतांसारखा चायनीज मॉडेल नाही.”

“यापुढे संजय राऊत भाजपच्या नेत्यांबद्दल बोलले तर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे कपडे ठेवणार नाही. संजय राऊतांसारखी माणसं बाजारात विकत मिळतात, चोर बाजारात फार स्वस्त दरात भेटतात. राऊत यांनी शिवसेनेबद्दल आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरें बद्दल बोलणं, ही त्यांची लायकी नाही. त्यामुळे बोलताना त्यांनी विचार करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोलावं. बोलण्याआधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची इज्जत ठेवायची असेल. त्यांचे कपडे वाचवायचे असतील तर बोलू नये. अन्यथा मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे कपडे काय ठेवणार नाही, “असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.