सातारा | राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडताना सतत दिसून येत आहे. अशातच शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे आता या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
आज खासदार संजय राऊत यांनी शंभूराजे देसाईंच्या पाटण मतदार संघात येऊन त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर ड्राय डेच्या नावाखाली ते पैसा गोळा करत असल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी पाटण तालुक्यातील गुढे गावात शिवसंवाद मेळावा घेत त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय राऊत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना बडवे आणि भडवा असा उल्लेख करत त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच यावेळी शिवसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे जोरदार शक्तीप्रदर्शनही यावेळी करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, पाटण तालुक्यातील हे चित्र बघून 2024 ची निवडणूक ही पाटण तालुक्याला नवीन दिशा देणारी ठरणार आणि येथे पुन्हा भगवा फडकणार असा इशाराही त्यांनी शंभूराज देसाई यांना दिला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मंत्री शंभुराज देसाई यांना ड्राय डेची चिंता आहे, मात्र ड्राय डेच्या नावाखाली पैसे गोळा करतो, यावर गुन्हा दाखल।झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले की, बाकी सर्व बडवे आणि भडवे आहेत त्यातला एक पाटणमध्ये जन्मला आला आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.