Latest Marathi News

BREAKING NEWS

बागेश्वर बाबा यांना मुंबईचे नाव बदलून ठेवायच आहे हे नाव !

0

मुंबई । शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उसामनाबाद या दोन जिल्ह्यांचे नाव बदलले असून केंद्र सरकारनेही त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे, शासकीय स्तरावरही या दोन जिल्ह्यांचे नामांतर झाले असून औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर बनलंय. तर, उस्मानाबाद हे धाराशिव बनलंय. त्याच पार्श्वभूमीवर नामांतरणाचा मुद्दा राज्यभर आणि देशभर गाजत आहे.

मात्र आता, गेल्या काही दिवसांपासून चमत्कार दाखवून आणि मनातले ओळखून चर्चेत असलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी मुंबईचं नाव बदलण्याचं विधान केलंय. मुंबई शहराचं यापूर्वीच नाव हे बॉम्बे होतं. मात्र, बॉम्बे नाव बदलून ते मुंबई करण्यात आलंय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर जगाची नजर असते. त्यामुळे, मुंबई जगप्रसिद्ध शहर असून कोट्यवधी लोकांची भूक भागवण्याचं काम मुंबई करते.

मात्र, या मुंबईला माया नगरी असंही संबोधलं जातं. बॉलिवूड विश्व, आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारीही मुंबईची ओळख आहे. त्यामुळे, मुंबईला माया नगरी म्हटलं जातं. मात्र, मुंबईचं हेच माया नगरी नाव बदलायचंय, मुंबईला माया नगरी म्हणू नका, असे आवाहन धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय. धीरेंद्र शास्त्री हे २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम येथे मोठ्या गर्दीत पार पडला. मात्र, त्यांच्या मुंबई दौऱ्यालाही अनेकांचा विरोध होता. तर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही त्यांना आव्हान दिलं होतं. त्यावरही, धीरेंद्र शास्त्री यांनी भाष्य केलंय.

मुंबईतील येड्यांनो तुम्ही म्हणता ही माया नगरी आहे, पण आता मी म्हणतो माया नगरीला माधव नगरी बनवायचं आहे. तुम्ही माया खूप जमा केली, आता बागेश्वर धामसोबत माधवलाही सोबत घेऊया, असे आवाहनही बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांनी केलंय. तसेच, मी आव्हांना घाबरत नाही, मी जर महाराष्ट्रात आलो नसतो तर विरोधकांना जिंकल्याचा आनंद झाला असता, असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपण कुणालाही घाबरत नसल्याचे म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.