नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिर कधी उघडणार याची तारीख कालच गृहमंत्री अमित शाह यांनी घोषित केली. अन् आज दुसऱ्या दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्येतील हे राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल कायदा या दहशतवादी संघटनेने दिल्याचं वृत्त हाती आलं आहे. आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात यासंबंधीची धमकी दिली आहे.
या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचं म्हटलं आहतसेच जिहादी समूहाच्या एका ऑनलाइन पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओकण्यात आली आहे. भारतातील सर्व मुस्लिमांना या जिहादमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सदर 110 पानांचे नियतकालिक आहे. संपादकीयात म्हटलंय की, ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येतंय, ते पाडलं जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवंय. विशेष म्हणजे या नियतकालिकातील मजकूर हा एखाद्या भारताशी संबंधित व्यक्तीने लिहिला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय