Latest Marathi News

BREAKING NEWS

अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छूक लवकरच..; विखे पाटलांच्या विधानाने नव्या चर्चांना उधाण

0

अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा वारंवार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील असाच दावा केला होता. विरोधी पक्षातील आमदार आमच्या संपर्कात असल्यानं आम्हाला बहुमताची चिंता नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील असाच दावा केला आहे. जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.नगर जिल्ह्यातील अनेक नेते सध्या भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना, केवळ अहमदनगर जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील अनेक मंडळी भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, कारण अन्य राजकीय पक्षांत त्यांना आता भविष्य उरलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दरम्यान पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणं टाळलं. जयंत पाटील नेमके कोणत्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.