Latest Marathi News

BREAKING NEWS

आंध्रप्रदेश चे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटे अटक

0

एकीकडे देशात मोदी सरकार विरोधात विरोधकांनी मोठं बदलेली असताना दुसरीकडे आता याचे पडसाद दिसून लागले असून आंध्रप्रदेशच्या राजकारणात मध्यरात्री एक मोठी घडामोड समोर आली असून एकच खळबळ उडाली आहे. तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना पोलिसांनी शनिवारी(पहाटे नंद्याल जिल्ह्यातून अटक केली. नायडू यांना कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) पिता-पुत्रावर ही कारवाई केली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यावर स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

२०२१ मध्ये नायडू यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. आंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे. तसेच चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा मुलगा नारा लोकेश याला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक केली आहे. सध्या चंद्राबाबू नायडू नांदयाल दौऱ्यावर होते. यावेळी शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना नायडू यांना पहाटे 3 वाजता नांदयाल येथून अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.