मुंबई। उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
तसेच राज्यात मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री असल्याचं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमृता फडणवीस प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले राऊत? संजय राऊत यांनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.
राज्यातील अस्थिरता फडणवीसांनी समजून घ्यावी. फडणवीसांचे नाकानं कांदे सोलनं सुरू आहे. फडणवीसांचे हात दगडाखाली आडकले आहेत. राज्यात अराजकता माजली आहे. विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल जात आहे. फडणवीस राहुल कुल यांना वाचवत आहेत का? असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
अमृता फडणवीस आणि अनिक्षा जयसिंघानी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, अमृता फडणवीस फसवणूक प्रकरण कौटुंबिक आहे. आम्हाला भाजपप्रमाणे कोणाच्या कुटुंबात घुसण्याची सवय नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना टोला दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. राज्यात मुख्यमंत्री नसून मख्खमंत्री असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.