Latest Marathi News

BREAKING NEWS

अमेरिकेतही आरपीआय पार्टी स्थापन करणार – रामदास आठवले

0

पुणे | सतत वादग्रस्त विधान करत चर्चेत राहणारे तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी थेट अमेरिकेत पक्ष स्थापन केल्याचे मोठे विधान केले आहे.अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आहे. तरीही अमेरिकेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आमच्या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नेपाळ येथे स्थापना केली आहे. तसेच जगभरातील देशांमध्ये पार्टी नेणार आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

तसेचपुढे मोदी आणि आपल्यात असलेल्या भाष्यावर बोलताना आठवले म्हणाले की, मोदी यांना पत्रकारांनीही गुजरात येथून दिल्ली येथे पोहोचविले. पत्रकारांनी मोदींना मोठा सपोर्ट केला. मलाही दिल्ली माहीत नव्हती, मला दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांचा हात आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरी- चिंचवड येथील एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केले होते.

आठवले म्हणाले, कायदा झाला तरी अत्याचार होतात. अजूनही दलितांवर अत्याचार होतात. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही. कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. कोरोना काळात शासनाने अनेक घटनांना मदत जाहीर केली. तशी पत्रकारांसाठी देखील मदत उपलब्ध होणे आवश्यक आहे. नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान आहेत. पत्रकारांनी त्यांना नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या, अडचणी मोदींना माहिती आहेत. त्यामुळे मोदी हे पत्रकारांचे प्रश्न सोडवतील. त्यासाठी मी स्वतः यांना बोलणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.