Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामांना कात्री, चंद्रकांत पाटील म्हणतात

0

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून नव्या सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या अनेक कामांना स्थगिती दिली आहे.आता चंद्रकांत पाटील यांनीही अजित पवारांना धक्का देत त्यांनी मंजूर केलेल्या बारामतीमधील कामांना कात्री लावली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत मंजूर कामांना चंद्रकांत पाटील यांनी कात्री लावली आहे.

यानंतर यावर प्रतिक्रिया देत अजित पवार यामुळे नाराज नसल्याचंही स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. एकूण 303 कोटीच्या कामाला परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी मंजूरी दिलेल्या बारामतीतील काही कामांना निधी देण्यात आलेला नाही. मात्र त्याने अजितदादा नाराज होणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, की ‘जिल्हा नियोजन समितीतून निधी वितरित न झाल्याने सुमारे 800 कोटीची कामं खोळंबली होती. त्यापैकी 303 कोटीच्या कामाला निधी देण्यात आला आहे.

एखाद्या नेत्याने त्यांच्या काळातील आमदाराला थोडा निधी देऊन आपल्याकडे मोठा निधी ठेवला असेल तर तो निधी कमी करण्यात येईल. बारामतीच्या निधीलाही अजित पवार रागावतील इतकी कात्री लावलेली नाही. ते अस्वस्थ होतील किंवा रागावतील आणि नाराजी व्यक्त करतील इतकी कात्री निश्चितच लावलेली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.