Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवारांचा टवाळखोर पोरांना इशारा, म्हणाले-

0

फॅमिली आणि मुलींना टवाळ पोरांनी काय केलं तर ते कुणाचंही पोरगं असेल, मी सोडणार नाही. बारामतीत सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे असे म्हणत अजित पवारांनी टवाळखोरांना इशारा दिला आहे. वाढती गुन्हेगारी आणि गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी हा इशारा दिला आहे. तसेच गार्डनमध्ये मुलं मुली बसले आणि एखादा वेडवाकडं वागला तर त्याची गय करणार नसल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

अजित पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर आले आहेत. बारामतीमधील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी बारामतीतील कायदा व सुव्यवस्थेला ठेच लावणारा मग तो कोणीही असो… त्या कोणत्याही टुकार पोराला सोडणार नाही. प्रत्येक आई-बापाने आपल्या मुलाला समजावून सांगावं असं अजित पवार म्हणाले

बारामतीत कोणालाही असुरक्षित वाटणार नाही याची काळजी मला घ्यावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक सर्व उपाय आखावे लागतील असा सज्जड दम अजित पवारांनी दिला. तसेच आजचा वेळ मी कुटुंबासाठी दिला आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. माझा भाऊ 60 वर्षात पदार्पण करतो आहे. त्याचे केस पांढरे आणि माझे केस काळे आहेत. हा रंगाचा परिणाम असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या विचारांना वाट मोकळी करुन दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.