Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवार यांचं नेतृत्व मान्य करण्यापलीकडे रोहित पवार यांच्याकडे दुसरा पर्याय नाही

0

मुंबई : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मागच्या काही दिवसांपासून सभागृहात कर्जत MIDC प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कर्जतच्या पाटेवाडीमध्ये एमआयडीसी प्रकल्प येणार आहे. मात्र या संदर्भात ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेवर भाजपचे नेते, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. तसंच रोहित पवार अजित पवार भेटीवरही त्यांनी भाष्य केलं होत.

रोहित पवार यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कर्जत एमआयडीसी आणि मतदारसंघातील इतर प्रश्नांसंदर्भात असल्याचं रोहित पवार यांनी ट्विट केलं. पण यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली आहे. अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करण्यापलीकडे त्यांना दुसरा पर्याय दिसत नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील एमआयडीसी व्हावी म्हणून आग्रह आहे. रोहित पवार यांचं पॉलिटिकल स्कोरिंग सुरू आहे. एमआयडीसी मिळणे बाबत ते किती गंभीर आहे, हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण राम शिंदे यांची मागणी असल्याने सरकार निश्चितच प्रयत्न करेल, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. आता विखे पाटलांच्या टीकेला रोहित पवार काय प्रतिउत्तर देतायत हे पहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.