Latest Marathi News

BREAKING NEWS

नागालँडमध्ये अजित पवारांना धक्का

0


राष्ट्रवादीचे ७ आमदार आता एनडीपीपी सत्ताधारी पक्षात सामिल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नागालँडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनालिस्ट डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीत प्रवेश केला. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी ही नागालँडमध्ये मुख्य आणि मोठा विरोधी पक्ष होता. आता हे आमदार सत्ताधारी पक्षात गेल्याने या सरकारला कुठलाही धोका उरलेला नाही.

या नवीन राजकीय घडामोडींमुळे नागालँडमधील नेफ्यू रिओ सरकार पूर्ण बहुमतात आले आहे. ६० सदस्यीय विधानसभेत आता पक्ष मजबूत झाला आहे. या सरकारला आता धोका नाही. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँडमधील आमदारांनी अजित पवार यांची बाजू घेतली होती. त्यानंतर आता या ७ जणांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले होते. एनसीपी राज्यातील तिसरी सर्वात मोठी पार्टी ठरली होती. एनडीपीपी, भाजपानंतर या पक्षाने राज्यात १२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर एनसीपीचे अस्तित्व दिसून आले होते.

राष्ट्रवादीच्या ७ आमदारांचा गट सत्ताधारी एनडीपीपीत सहभागी होण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी मंजूरी दिली. यामध्ये नामरी नचांग, के. ए. पोंगशी फोम, पिक्टो शोहे, वाई म्होनबेमो हम्त्सो, वाई मनखाओ कोन्याक, के. एस. तोइहो येप्थो यांनी आता सत्ताधारी एनडीपीपी पक्षात प्रवेश केला. हे विलीनीकरण दहाव्या अनुसूची अंतर्गत संवैधानिक गरज पूर्ण करत असल्याचे सभापती म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणास मंजूरी दिली. विधानसभा सचिवालयाला पक्ष संलग्नतेविषयीचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे विलीनीकरणाचे पत्र दिले होते. त्याला अध्यक्षांनी मंजूरी दिली. त्यानंतर १४ व्या नागालँड विधानसभेत एनडीपीपी सदस्यांची संख्या २५ वरून ३२ इतकी झाली. या नवीन राजकीय समीकरणामुळे मुख्यमंत्री आणि सरकार मजबूत झाल्याचे पक्ष प्रवक्ते केन्ये म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.