राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त्त छत्रपती शिवाजी पार्क मैदान,दादर मुंबई येथील शासकीय कार्यक्रमादरम्यान भाषण केले.यावेळी त्यांनी विवध विकास कामे आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत भाष्य केले.कोश्यारी यांनी सुरुवातील प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यानंतर कोश्यारी यांनी नाव घेत सर्व महापुरुषांना अभिवंदन केले.
“छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान समाजसुधारक यांना मी विनम्र अभिवादन करतो” असं कोश्यारी यावेळी म्हणाले. “स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दहा हजार रुपये वाढ केली असून आता ते वीस हजार रुपये इतके करण्यात आले आहे. पाच हजार चारशे सहा स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ होणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंचाहत्तर हजार रिक्त पदे भरत असून नुकतीच याची सुरुवातही करण्यात आली आहे. राज्यातील अठरा हजार तीनशे एकतीस पोलीस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत.माझ्या शासनाने नुकताच मुंबई ते नागपूर या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या सातशे एक किलोमीटर लांबीपैकी नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पाचशे एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण करुन हा रस्ता वाहतुकीस खुला केला आहे. चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जोडले गेले आहेत.