मुंबई |
हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर खोऱ्याला सफरचंदांचे आगर म्हणून ओळखले जाते; मात्र वायव्य (उत्तर-पश्चिमी) प्रांतात झालेल्या मोठ्या पावसामुळे तयार झालेल्या सफरचंदांचा बागा नष्ट झाल्या. परिणामी, ५० टक्के उत्पादनात घट आली.
यामुळे हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर भागातून यावर्षी देशाला सफरचंदांचा पुरवठा कमी होणार आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिमाचल प्रदेश प्रांत, नवी मुंबई कृषी उत्पन्न समितीतून एक दिवस आड येणाऱ्या सफरचंदांच्या आवकेवर परिणाम होणार आहे.
आवक कमी आणि मागणी जास्त झाल्याने सफरचंदांचे प्रति किलोच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तुर्की, वॉशिंग्टन, युरोपियन देशातून येणाऱ्या सफरचंदांपेक्षा हिमालच प्रदेश, काश्मिरी सफरचंद चवीला गोड, कुरकुरीत असते.