Latest Marathi News

BREAKING NEWS

आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर शहाजीबापू पाटील यांचा पलटवार; म्हणाले,

0

राज्यात भारतीय जनता पक्षाच्या मदतीने शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधात बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळत आहे अशातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन दिले होते या आवाहनानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आददित्य ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.. “एखाद्या फाटक्या माणसाकडून आम्ही तुमचा पराभव करुन दाखवू’ अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे. वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या आव्हानांवर बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांनी लवकरच राजीनामा द्यावा आणि मंजूर करुन घ्यावा. त्यांनी टीव्हीवर आव्हान देऊ नये. पटकन राजीनामा लिहायचा आणि राज्यपालांकडे द्यायचा. मग मैदानात उतरण्याचे आव्हान द्यावे. आम्ही एखाद्या फाटक्या माणसाकडून त्यांचा पराभव करु दाखवू”. असं ते म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आदित्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातील 13 खासदार आणि 40 आमदारांनी गद्दारी केली. पण त्या सर्वांना मी आजही चॅलेंज देतो. तुम्ही तुमच्या आमदारकी, खासदारकीचा राजीनामा द्या. त्यानंतर पुन्हा निवडून येता का ते पाहा. मी तर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलं आहे. मी वरळीमधून राजीनामा देतो. तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून उभे राहा. मग पाहू तुम्ही कसे निवडून येता? असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.