Latest Marathi News

BREAKING NEWS

आतापर्यंत संयमाने बोललो, पण.. संजय राऊतांचे थेट फडावीसांना आवाहन

0

बारसू प्रकल्पाच्या मुद्दयावरून आता शिंदे फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार वादावादी सुरु झाली आहे. अश्यातच बारसू प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्रं लिहिल्याचा आरोप देवेंद्र फडवीसांसह शिंदे गटाने केला होता. आता या टीकेला थेट खासदार संजय राऊतांनी प्रतिउत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी सुपाऱ्या घेऊन बोलू नये. महाराष्ट्रात शिवसेनेला सुपारी घेण्याची गरज भासली नाही.

शिवसेना फोडायची गरज कोणाला पडली? तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, सुपारी घेऊन हल्ले करू नका. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत संयमाने आम्ही विधाने केली. पण तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर लक्षात घ्या, कागदावर तुम्ही शिवसेना वेगळी केली असेल पण त्या कागदालाही वाळवी लागलीय असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला.

संजय राऊत म्हणाले की, कोकणची जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे. स्थानिक भूमिपूत्रांना विषारी जहरी प्रकल्प नको असेल आणि त्यासाठी ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेना छातीवर घेईल. बारसू प्रकल्पाबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. उद्योग राहिला पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे. उद्योग जगला तर कामगार जगेल ही आमची भूमिका कायम आहे. मग एअर बस, फॉक्सकॉन वेदांत हे बाहेर का गेले? त्यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावे.

कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत. बारसू प्रकल्पाजवळ अनेक धनिकांनी जमीन घेतले असा आरोप त्यांनी केला. तसेच २०२४ मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, देवेंद्र फडणवीस खोटे बोलतात. त्यांच्या अंतरंगात काय ते आम्हाला माहिती, इतका अपमान सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. बोलतात एक पण त्यांच्या अंतरंगात जी वेदना आहे ती जवळच्या लोकांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचे अंतरंग धगधगतंय असं राऊतांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.