Latest Marathi News

BREAKING NEWS

आता काहीही झालं तरी… शरद पवारांनी घेतली रोखठोक भूमिका !!

0

अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवार यांचाच हात असल्याची चर्चा राज्यासह देशभर रंगली. तसेच यामागचा सूत्रधार शरद पवार असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र शरद पवार यांनी आपण भाजपच्या विरोधात लढा देणार असल्याचं म्हटलं. शिवाय अजित पवार यांच्या कृतीला आपलं समर्थन नाही, असं जाहीर केलं.

अशातच दोन्ही गटांनी पाच जुलैला बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत आरोप प्रत्यारोप झाले. मात्र त्यानंतर या घडामोडींवर शरद पवार यांनी आपली उघड भूमिका मांडली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या ‘मौनाचे’ अनेक अर्थ काढले जाऊ लागले. त्यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं. मात्र आता शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवार यांनी ठामपणे आपली भूमिका बोलून दाखवली आहे. आपल्याला भाजपच्या विरोधात लढायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांची साथ सोडायची नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. देशातील विरोधकांची आघाडी ‘INDIA’ च्या बैठकीचं चांगलं नियोजन करा, अशा सूचनाही शरद पवार यांनी दिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.