Latest Marathi News

BREAKING NEWS

आपल्या महाराष्ट्रात आजही काही मुघल, निजाम बाकी, सिरसाठांचा जलील यांना टोला

0

केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ’धाराशिव’ करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादीचा लढाई सुरू झाली आहे. तर दुसरीकडे एमआयएमने या नामांतरास विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(Imtiaz Jalil) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली असून सरकारविरोधात मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी खासदार जलील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

संजय शिरसाट म्हणाले, आमच्या महाराष्ट्रात आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना हे नाव आवडलेले नाही. त्यांचे म्हणणे त्यांच्या पद्धतीने योग्य आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने राजकारण करायचे आहे. ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. त्या औरंगजेबाचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव शहराला दिल्याने यांना कसला त्रास होतो? तुम्ही औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकता. तेव्हा आम्ही तुम्हाला विरोध केला नाही.

तसेच तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा. परंतु औरंगजेबाबद्दल तुम्हाला एवढा पुळका असण्याचे कारण काय? मग आपल्या मुलांची नावे औरंगजेब ठेवा. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नसते. महापुरुषांचा अभिमान जागृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, तर त्यात गैर काय? आम्ही दिलेल्या नावाला तुमचा विरोध असण्याचे कारण काय? मुघलशाही, निजामशाही, औरंगाबाद, निजामाबाद, उस्मानाबाद ही त्यांची ओळख आहे. मात्र आम्हाला ती नको आहे.

त्यांना रस्त्यावर यावे लागेल. कारण यांचे राजकारण केवळ आपल्या समाजापर्यंत सीमित आहे. आम्ही जर असे काही बोललो तर लगचे आमच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप करतात. आता ते जे बोलत आहेत ते योग्य आहे, कारण ते जातीसाठी बोलत आहेत? त्यांचे केवळ राजकारण जातीवरच अवलंबून असल्याने, त्यांना रस्त्यावर उतरावेच लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.