Latest Marathi News

BREAKING NEWS

आम्ही गद्दारी का केली? गुलाबराव पाटलांची जाहीर सभेत कबुली !

0

आम्ही गद्दारी केली अशी आमच्यावर टीका होते. मात्र, गद्दारी का केली याची कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेसारखा चेहरा शिवसेनतून बाहेर जात होता म्हणून गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेसाठी मी त्याग केल्याचे गुलबाराव पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना बोललो होतो की, एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा, आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलवले पाहिजे. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आणि मराठा चेहरऱ्याच्या मागे उभे राहिल्याचे पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या बाजुला बसतो यावरच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही जोरदार टीका केली.

जे सकाळी एका सोबत शपथ घेतात, दुपारी दुसऱ्यासोबत जातात आणि संध्याकाळी तिसऱ्यासोबत सरकार बनवतात त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नसल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केली. अजित पवार यांनी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांवर टीका केली होती. उध्दव ठाकरे यांना सोडून शिवसेनेतून बाहेर पडलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी पुण्यात केली होती. या टिकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं.

अजित पवार यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. जनता हुशार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. जे सकाळी कुणाबरोबरच शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणासोबत जातात आणि तिसऱ्या दिवशी कोणासोबत सरकारमध्ये बसतात, त्यांनी या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.