Latest Marathi News

BREAKING NEWS

आजपासून महिलांना एसटी प्रवासात ५०% टक्के सवलत; शासन आदेश जारी

0

राज्यभरातील सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. आजपासून महिलांना ST प्रवासात 50% सवलत मिळणार आहे. त्याबाबतचा शासनाचा आदेश जारी झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना ST प्रवासात 50% सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आह। या नरियाचे सर्व महिला संघटनकडून स्वफत करण्यात आले असून काही प्रमाणात महिला प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस म्हणजे, साधी बस, मिडी, मिनी, निमआराम बस, विनावातानुकुलीत शयन-आसनी बस, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) या बसमध्ये आजपासून 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच यापुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये महिलांना ही सवलत मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.