Latest Marathi News

BREAKING NEWS

आज सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन, जिथे असाल तिथे उभे राहून व्हा सहभागी

0

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव अंतर्गत आज सकाळी 11 वाजता सामान्य नागरिकांपासून सगळ्यांनी जे जिथे उभे असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्येक शासकीय व निमशासकीय, खाजगी आस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी समूह राष्ट्रगीत गायनाचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत उद्या 17 ऑगस्ट रोजी स्वराज्य सप्ताह अंतर्गत समोर राष्ट्रगीत गायनाबाबत राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. आज सकाळी 11 वाजता सर्व शासकीय कार्यालय,शाळा, महाविद्यालय, निम:शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापना, केंद्र शासनाची सर्व कार्यालय, आस्थापना, जिल्ह्यातील नोंदीत असणारी व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल्स, दुकाने, बाजार, मॉल, जिल्ह्यातील सेवा पुरवठादार, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, धर्मदाय आयुक्त यांच्याकडील नोंदीत असणाऱ्या सर्व संस्थानी उद्याच्या या समूह राष्ट्रगीत कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन समूह समूह राष्ट्रगीत गाणार आहेत. जिल्हा परिषदेतही सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित समूह राष्ट्रगीत गाणार आहेत. सामान्य नागरिकांनी ते ज्या ठिकाणी उपस्थित असतील त्या ठिकाणी आपल्या घरात किंवा बाहेर वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.