Latest Marathi News

BREAKING NEWS

अखेर मंत्रीमंडळाचा विस्तार या तारखेला होणार ? इतक्या जणांचा होणार मंत्रिमंडळात समावेश

0

 

मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येऊन 15 दिवस उलटले आहे, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही मुहुर्त अजून सापडलेला नाही. पण, आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून 19 ते 21 जुलै दरम्यान, 10 मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उरकला जाण्याची शक्यता आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येऊन आता 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधकांकडून टीका होत आहे. पण, फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये कुणा-कुणाला मंत्रिपद द्यायचे यावरून अजूनही एक वाक्यता आलेली नाही.

तसेच शिवसेना बंडखोर आमदारांच्या नाराजीची भीती आणि भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे. पण, आता होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. त्यामुळे नाराज इच्छुकांचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर 19 किंवा 21 जुलै रोजी ठराविक 10 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे. या मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत. शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहे. शिंदे गटामध्ये 40 बंडखोर आमदार आणि 10 अपक्ष आहे, त्यामुळेच शिंदे गटाला जास्त मंत्रिपदं हवी आहेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे. त्यामुळेच भाजपकडून याला होकार दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.