Latest Marathi News

BREAKING NEWS

आघाडी होणार बिघाडी | शिवसेना पदाधिकारीही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत

0

पुणे | कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उतरवला जाणार असल्याची चर्चा सुरू असून अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणीही केली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या जागेसाठी राष्ट्र्रवाई आणि शिवसेना वेगवेगळी मते मांडताना दिसून येत आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे अनेक इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. याबाबत भाजपने पाच जणांची नावे प्रदेश कार्यालयाला पाठविली आहेत. या पोट निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेना देखील उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कसबा पोटनिवडणूक लढवण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाकरे गटाची नुकतीच पुण्यात बैठक पार पडली. यात शहराध्यक्षांना उमेदवारी देण्याची इच्छा पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, बैठकीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल केले जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून या उमेदवारीबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.