स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन सुरू केले आहे. स्वाभीमानीने चक्काजाम आंदोलन करुन शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे, यावर मंत्री उदय सामंत यांनी टीका केली.”मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे येण्यासाठी आज मोठमोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. पण आपण त्यामध्ये नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनही करावी लागत आहेत, अशी टीका सावंत यांनी केली.
या टीकेला आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेट्टी म्हणाले की, ‘ स्टंट कोण करतय हे आता लवकरच दाखवू, ज्यांनी ५० खोके घेतले आहेत. त्यांनी आम्हाला स्टंटची भाषा शिकवू नये, असं प्रत्युत्तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री उदय सामंत यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही विधानसभेला धडक देणार आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.
काय म्हणाले होते उद्या सामंत ? “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे येण्यासाठी आज मोठमोठ्या नेत्यांचा ओघ वाढला आहे. पण आपण त्यामध्ये नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची आंदोलनही करावी लागत आहेत.” असा टोला स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनाला उदय सामंत यांनी लगावला.