पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आता आज पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये ’50 खोके एकदम ओके’ चे बॅनर घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे.यावेळी कर्नाटक सरकारविरोधातही घोषणा दिल्या. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यावर बॅनर आणि फलक घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अजित पवार, अंबादास दानवे, धनंजय मुंडे आक्रमकपणे घोषण देत होते. यावेळी जयंत पाटील, आदित्य ठाकरे सुद्धा सामील झाले होते. मागे पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी 50 खोके एकदम ओके घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी आमदार आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली होती. पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आता आज पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनामध्ये ’50 खोके एकदम ओके’ चे बॅनर घेऊन विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे.
यावेळी कर्नाटक सरकारविरोधातही घोषणा दिल्या. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यावर बॅनर आणि फलक घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.अजित पवार, अंबादास दानवे, धनंजय मुंडे आक्रमकपणे घोषण देत होते. यावेळी जयंत पाटील, आदित्य ठाकरे सुद्धा सामील झाले होते. मागे पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी 50 खोके एकदम ओके घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे सत्ताधारी आमदार आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली होती.