Latest Marathi News

BREAKING NEWS

गणेशोत्सवासाठी १०८ क्रमांकांच्या ४० रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणात बाईक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

0

पुणे , १७ सप्टेंबर : आपल्या सर्वांचाच आवडता गणेशोत्सव आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. या उत्सव काळात सर्वसामान्यांमध्ये उत्साह तर पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण असतो. दहा दिवस मोठ्या आनंदाने सर्वजण गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात. मात्र, दुसरीकडे आपले पोलीस बांधव अहोरात्र सेवा बजावतात.‌ या पोलिसांची सेवा करता यावी यासाठी ‘आम्ही पुणेकर’ हि संस्था पुढे सरसावली आहे. या संस्थेच्या स्त्युत्य उपक्रमाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले. रविवारी फरासखाना पोलीस चौकी येथे एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

या काळात सर्व पुणेकरांचे आरोग्य उत्तम रहावे; यासाठी ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने आरोग्य सेवेची व्यवस्था करण्यात आली असून, गणेशोत्सव काळात ही संस्था पोलीस बांधवांची काळजी घेणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आम्ही पुणेकर या संस्थेच्या स्तुत्य कार्यास चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. इतरांनीही यामध्ये योगदान द्यावे असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.‌ तसेच गणेशोत्सवासाठी १०८ क्रमांकांच्या ४० रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणात बाईक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार असल्याची ग्वाही यानिमित्ताने पाटील यांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.