बार्शीच्या हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमीतून 4 खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रित साखळी स्पर्धेसाठी निवड!
बार्शीतील सुप्रसिद्ध हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी (प्रमुख प्रशिक्षक: आनंद शेलार) यांचा अजून एक दिमाखदार यश!
या अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या चार खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
इद्धांत जैन, संदेश गाडे, प्रसाद मुके यांची अंडर-16 सोलापूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली असून हे तिघे आज रात्री संभाजीनगर येथे सामन्यांसाठी रवाना होणार आहेत.
तर सुमित घळके याची निवड धाराशिव जिल्ह्याच्या अंडर-16 संघात झाली असून तोही आज रायगड येथे रवाना होत आहे.
प्रशिक्षक आनंद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी केवळ क्रिकेट कौशल्यात नव्हे तर फिटनेस, पोषण, आणि मानसिक तयारीतही झपाट्याने प्रगती केली आहे.
या निवडीमुळे बार्शीतील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडले आहेत.
“ग्रामीण भागातही आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण मिळू शकतं” हे या यशामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे!