Latest Marathi News

BREAKING NEWS

२०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार?

0

२०२४ ला होणारी लोकसभेची निवडणूक आणि दीड वर्षावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करत आहे.

अशातच तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत वारंवार भाष्य करत आहेत. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

अमरावतीत झालेल्या एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, एकत्र लढण्याची इच्छा आहे. मात्र केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आताच सांगता येणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

एकीकडे संजय राऊत हे २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच लढणार, असं संजय राऊत हे वारंवार सांगत आहेत. उद्धव ठाकरे हेही एकत्र लढण्यास उत्सुक आहेत. मात्र शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.